रेशन दुकानदारांना हवे महिना पन्नास हजार मानधन

बुलडाणा, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति महिना 50 हजार रुपये मानधन देण्यात यावे, केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणारी स्वस्त धान्य दुकानातील वितरण धान्य प्रती असलेले कमिशन वाढवून देण्यात यावे केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या धान्याचे कमिशन केंद्राकडून राज्याला मिळालाय परंतू ते जिल्ह्याकडून स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत पोहोचलो नाही ते तात्काळ देण्यात यावे यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेदनासाठी स्वस्त धान्य दुकानदार , केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आज एक डिसेंबरला लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनातील एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आपल्या मागण्या संदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ही संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश अंबुसकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. या धरणे आंदोलनामध्ये जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ML/KA/SL
1 Dec. 2023