या बलाढ्य संघाला हरवून युगांडाचा T20 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये प्रवेश

 या बलाढ्य संघाला हरवून युगांडाचा T20 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये प्रवेश

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आफ्रिका खंडातील युगांडा या देशाने झिम्बाब्वेचा पराभव करत २०२४ च्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश केला आहे. युगांडा हा आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळणारा दक्षिण आफ्रिकेतील पाचवा देश ठरला आहे. युगांडा हा या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा २० वा संघ ठरला आहे. जून २०२४ मध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील सामने वेस्टइंडिज आणि अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. टी-२० वर्ल्डकप २०२४ हा स्पर्धेचा ९ वा हंगाम आहे. ही स्पर्धा ४ जूनपासून सुरु होणार असून स्पर्धेतील अंतिम सामना ३० जून रोजी खेळवला जाणार आहे.

युगांडासह नानिबियाने देखील आफ्रिका खंडातून टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश केला आहे. यामुळे झिम्बाब्वेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण झिम्बाब्वेला यापूर्वी झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही प्रवेश करता आला नव्हता.
युगांडाने पात्रता फेरीतील ६ पैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला. यासह पहिल्यांदाच युगांडाचा संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

या स्पर्धेत सर्व २० संघ ४ गटात विभागले जाणार आहेत. प्रत्येक गटात ५ संघ असणार आहेत. प्रत्येक गटातील २ संघ टॉप ८ मध्ये प्रवेश करतील. हे ८ संघ २ गटात विभागले जातील.या गटातील टॉप २ संघ नॉक आऊटमध्ये प्रवेश करतील. या ४ पैकी २ संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील.

स्पर्धेसाठी पात्र ठरलेले देश

वेस्टइंडिज, यूएसए, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका,न्यूझीलंड, पाकिस्तान,अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ,ओमान ,नामिबिया, युगांडा

SL/KA/SL

30 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *