अजितदादांनी तुमच्या जीवावर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घेतलीय
कर्जत, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अजितदादांनी तुमच्या जीवावर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घेतली आहे, ती आपल्याला पार पाडायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबिराची सुरुवात आज कर्जत येथे झाली त्यात ते बोलत होते.
भिन्न विचारसरणीचे वेगवगळे पक्ष देशात एकत्र येतात तर मग आम्ही शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो तर आमचे काय चुकले असा सवालही तटकरे यांनी उपस्थित केला. अजितदादांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला हे स्पष्टपणे ठणकावून सांगतानाच अजितदादांचे पक्षासाठीचे योगदान कोण विसरू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘घड्याळ तेच वेळ नवी’ या वैचारिक शिबीरातून नवी दिशा घेत पक्षाची भविष्यात वाटचाल करायची आहे.
अजितदादांनी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे हे कृतीतून दाखवून देऊया असे आवाहनही तटकरे यांनी यावेळी केले.
या शिबीराच्या सुरुवातीला ध्वजारोहण राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वैचारिक मंथन शिबीरामध्ये पक्षाचे अधिकृत गाणेही प्रसारित करण्यात आले. या वैचारिक मंथन राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत तथा पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सेवादल अध्यक्ष राजेंद्र लावंघरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीसभाई नायकवडी आदींसह पक्षाचे आमदार, खासदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, युवक, युवती, महिला, विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित होते.
ML/KA/SL
30 Nov. 2023