एकनाथ शिंदे यांना काढून टाकण्याचा अधिकारच ठाकरेंना नव्हता

 एकनाथ शिंदे यांना काढून टाकण्याचा अधिकारच ठाकरेंना नव्हता

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपसोबतची युती शिवसेनेच्या हितासाठी, नैतिक तसेच तात्विक फायद्यासाठी होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबतची महाविकास आघाडी ही बेकायदेशीर आणि मतदारांचा विश्वासघात करणारी होती असे शिंदेसोबतच्या आमदारांचे म्हणणे होते. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या संघटनात्मक पदावरून काढून टाकण्याचा उध्दव ठाकरे यांना अधिकार नव्हताच असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकिल अँड. महेश जेठमलानी यांनी आज केला.

आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुरु असलेल्या सुनावणीच्या आजच्या पाचव्या दिवशी शिंदे गटाचे वकिल अँड. जेठमलानी यांनी शिवसेनेचे (उ बा ठा) मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची पुन्हा उलटतपासणी केली. आजच्या संपूर्ण दिवसातील सुनावणी ही एकनाथ शिंदे यांना २२ जून २०२२ रोजी पाठवलेल्या पत्राभोवती फिरत होती. पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहाण्यासाठी पाठवलेले पत्र कसे पाठवले आणि पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिला नाहीत तर कारवाई करावी लागेल असा त्या पत्राचा मजूकर होता. हाच प्रश्न सुनील प्रभू यांना वेगवेळ्या प्रकारे पुन्हा विचारण्यात आला.

म्हणून पत्र इंग्रजीत

तुम्ही हे पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिले आहे का आणि त्याचा अर्थ तुम्हाला कोणी मराठीत सांगितला का असा प्रश्न महेश जेठमलांनी यांनी केला त्यावर हो, ते पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशून आहे त्याचा मजकूर मला मराठीत समजावून सांगण्यात आला असे प्रभू यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

हे पत्र एकनाथ शिंदे यांना लिहिले मग इंग्रजीत का लिहले या प्रश्नावर भविष्यात कायदेशीर बाबींसाठी आवश्यक्ता भासू शकते म्हणून इंग्रजी लिहिल्याने सुनील प्रभू म्हणाले. या पत्राच्या संदर्भात कायदेशीर पेच उदभवू शकते असे का वाटले या प्रश्नावर, प्रभू म्हणाले त्यावेळी राजकीय पेच निर्माण झाला होता तेव्हा वाटले की भविष्यात कायदेशीर पेच उदभवू शकतो असे वाटले

पत्र ईमलेव्दारे पाठवले

२२ जून २०२२ रोजीचे पत्र एकनाथ शिंदे यांना कोणत्या माध्यमातून दिले एक दीड वर्षांपूर्वीचा तपशील मला आठवण नाही पण वाटसअँपच्या माध्यमातून असे उत्तर प्रभूंनी दिले. त्यावर वाँटसअँपचे मेसेज सादर करू शकता का असे विचारताच आता सादर करू शकत नाही, पण उद्या सादर करू शकता का या प्रश्नावर आत मी नेमक सांगू शकत नाही बघतो मी प्रयत्न करतो असे उत्तर त्यांनी दिले.

अध्यक्षांना सादर केली ई मेलची प्रत

जेवणाच्या ब्रेकनंतर कामकाज सुरु होताच एकनाथ शिंदे यांना २२ जूनचे ई मेलच्या व्दारे पत्र पाठवले होते असे स्पष्ट केले. त्यावर कोणत्या ई मेल आयडीवरून पाठवले, कोणी पाठवले, हे पत्र ईमेलव्दारे पाठवल्याचे तुम्हाला कसे कळले मग तुम्ही सुरवातीला वाँटसअँपवरून पाठवल्याचे का सांगितले अशी प्रश्नांची सरबत्ती जेठमलानी यांनी केली , त्यावर ते पत्र ई मेलव्दारे पाठवल्याची माहिती आताच मी आँफीसमध्ये जाऊन घेतली मी यामध्ये काहीही लपवलेले नाही. खरे ते सांगितले आहे. असे सांगत एकनाथ शिंदे यांना २२ जून रोजी पाठवलेल्या ई मेलची प्रत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर केली.

हे चुकीचे आहे.

एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांना शिवसेनेच्या संघटनात्मक पदावरून काढून टाकण्याचा उध्दव ठाकरे यांना अधिकार नव्हता असा युक्तीवाद महेश जेठमलानी यांनी केला त्यावर हे खोटे असल्याचे प्रभू म्हणाले. Thackeray had no right to remove Eknath Shinde

ML/KA/PGB
29 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *