पावसामुळे पिके भुईसपाट, जिल्ह्यात ७१ मिमी पावसाची नोंद
जळगाव, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात रात्रभर जोरदार सरी बरसल्यानंतर बेमोसमी पावसाने आज सकाळपासून विश्रांती घेतली आहे. पण तोवर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे. जळगाव शहरात रविवारी रात्रभरात तब्बल ३९ मिमी पावसाची नोंद झाली तर तर जळगाव जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊस झाला आहे.
या अवकाळी पावसात तब्बल १ हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.मुसळधार पाऊस आणि गारांमुळे ऊस, केळी, पपई या बागायती पिकांसह मका तसेच तूर या पिकांना फटका बसला आहे. मात्र रब्बी हंगामातील हरभरा, गहू , ज्वारीला हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. लवकर पेरणी झालेल्या क्षेत्रावर वाढलेली दादर मात्र आडवी झाली आहे.
ML/KA/PGB 28 Nov 2023