अवकाळी पावसामुळे पिके भुईसपाट
परभणी, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणीत अवकाळी पावसामुळे पिके भुईसपाट तर नद्या दुथडी भरून वाहत आहेत.आजही
मुसळधार पावसाची हजेरी आहे . जिल्ह्यात काल पासून अवकाळी पावसामुळे ओढे नाले ओसांडून वाहिले तर पूर्णा,करापरा,दुधना नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
खरिपातील पिके पाण्याअभावी करपून गेल्याने शेतकरी अडचणीत असूनही कशीतरी ज्वारी,हरबरा,गहू पेरणी केली पण दोन दिवसांपासून विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस होत असल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत ,तर केळी,तूर आणि कापसाचा तोडांशी आलेला घास हिरावून घेतल्या सारखा झाला आहे .
ज्वारी आणि तूर भुई सपाट झाली आहेत. वेचणीला आलेला कापूस पुर्णतः खराब झाल्याने शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे
त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान शहरी भागासह ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी मोठी झाडे घरांवर आणि विजेच्या तारांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे तर वीज पुरवठा अद्यापही खंडित आहे,विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कडून प्रयत्न सुरू आहेत.
ML/KA/PGB 28 Nov 2023