अवकाळी पावसाने कापूस, तूर ,ज्वारीचे मोठे नुकसान
जालना, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात रविवारी रात्री अवकाळी पावसाने थैमान घातले. जवळपास सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टीने कपाशी, तूर या खरीप पिकांसह रब्बी ज्वारीचे आणि फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या तूर पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.
कापसाच्या ही वाती झालेल्या असून बहरात आलेली ज्वारी ही आडवी झाली आहे.
गोदावरी नदी आणि ही डावा कालवा परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. हे उसाचे पीक ही वादळी वाऱ्यामुळे आडवे झालेले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षेत्र जलमय झाल्यामुळे दोन ते तीन दिवस ऊस तोडी बंद राहतील. या पावसाचा फटका साखर कारखान्यांना देखील बसणार आहे. Heavy loss of cotton, tur, sorghum due to unseasonal rain
ML/KA/PGB
27 Nov 2023