सर्वत्र अवकाळी पाऊस, गारपीट – पिकांचे मोठे नुकसान…
बुलडाणा, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होते रात्रीच्या सुमारास मेघगर्जने आणि विजेच्या कडकडाटा सह जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली तर काही भागात तुफान गारांचा पाऊस झाला यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे…
सिंदखेडराजा आणि लोणार तालुक्यात रात्री गारांचा पाऊस झाला , या गारांमुळे शेतातील हरबरा गहू मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील रब्बी पिकांना कुठे दिलासा तर कुठे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे…
शेतातील कापूस पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, तसेच नेटशेडचे मोठे नुकसान झाले आहे, जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वच नेटशेड कोसळले आहेत त्यामुके लाखोंचे नुकसान झाले आहे..
जिल्ह्यातील 13 ही तालुक्यात रात्रीपासून पाऊस सुरु असून हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे सिंदखेडराजा आणि लोणार तालुक्यात प्रचंड शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही शेती खरडून गेली आहे तर काही शेतात अजूनही पाणी तुंबलेले आहे, गहू हरभरा आणि फळबागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Unseasonal rains, hailstorms everywhere – huge loss of crops…
ML/KA/PGB
27 Nov 2023