राज्यभरात पुन्हा अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यभरात आज पहाटेपासून पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यात परभणी जिल्ह्याला अवकाळी पाऊसाचा तडाखा बसला.
पहाटे 3 वाजल्या पासून विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस सुरूच होता.नांदेडमध्ये ही आज भल्या पहाटे 4 पासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावूस सुरू होता, त्याने रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी साचले. बीड जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने ढगाळ वातावरण तसेच पाऊस येणार असल्याचा अंदाजा दिला होता त्यानुसार छत्रपती संभाजी नगर शहरासह जिल्हात ठीक ठिकाणी सकाळ पासून ढगाळ वातावरण होते. सूर्याचे दर्शन देखील झाले नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली दहा वाजे नंतर मात्र पावसाने जोरदार सुरुवात केली. सुसाट वारा आणि विजांचा कडकडाट त्यात जोरदार पाऊस यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली होती. Unseasonal rain again across the state, crop damage
अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याच भागात रात्री प्रचंड विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरुवातील दोन तास जोरदार आणि रात्रीपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान उघड्यावर संसार प्रपंच असलेल्या ऊस तोडणी करणाऱ्या लोकांना मोठ्या संकटाशी सामना करावा लागला.
विदर्भात अमरावती शहरात मध्य रात्री पासून रिमझिम पाऊस पडत होता. संपूर्ण जिल्ह्य़ात ढगाळ वातावरण आहे. वाशिम जिल्ह्यात मध्यरात्री सर्वत्र मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला असून सकाळीही पावसाची रीपरीप सुरूच होती. नागपुरातही पावसाची रिपरिप सुरूच होती त्यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात सकाळपासून पुन्हा पाऊस पडला, हलक्या सरी सुरू राहिल्याने वातावरण थंड झाले. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले. कापून ठेवलेले भात पीक आणि झोडणी केलेल्या भाताचे ढीग पूर्णपणे भिजून गेले आहेत.
ML/KA/PGB
27 Nov 2023