मुगाची धिरडी

 मुगाची धिरडी

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वजन कमी करण्यासाठी आहारात काही जाणीवपूर्वक बदल करणं आवश्यक आहे. वजन कमी होण्यासाठी नागली इतकंच मूग हे फायदेशीर कडधान्य आहे. वजन कमी होण्यासाठी नागली आणि मूगाच्या डाळीचे धिरडे फायदेशीर मानले जातात. नागली हे एक तृणधान्य असून आरोग्याच्या दृष्टीने नागलीला खूप महत्व आहे.

साहित्यः

१) आख्खे मुग दळुन आणलेले.
२) ओवा: एक छोटा चमचा
३) हळद, मीठ, तिखट चवीपुरते
४) आवडत असल्यास आलं-लसुण पेस्ट घालावी

वरील सर्व साहित्य एकत्र जरा पातळसर भिजवावे. लगेच नॉन-स्टीक वर अगदी थोडे तेल चमच्याने ओतुन फिरवुन घ्यावे, आणी भाजीचा चमचाभरुन हे मिश्रण टाकावे. छान जाळीदार धिरडी तयार होतात.
नुसती खायला ही चांगली किंवा आवळ्याच्या लोणच्याबरोबर खाल्ली तर अप्रतिम लागतात.

मुग पचायला हलका असल्याने ५-६खाल्ली तरी पोट हलके रहाते, अगदी लो कॅलरी आणी पटकन होण्यासारखे. तसेच मधुमेहावर पण अत्यंत गुणकारी. Muga’s courage

ML/KA/PGB
26 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *