मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी १०० किमीचा पुल तयार
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या महत्वाकांक्षी योजनेतील १००किलोमीटर व्हायाडक्ट आणि २३० किलोमीटर Pier (जमिनीपासून समुद्रापर्यंत बनवलेली लोखंडी किंवा लाकडी संरचना) चे काम पूर्ण झाले आहे. या कॉरिडॉरचे निर्माण करणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आज प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.मुंबई-अहमदाबाद प्रोजेक्टचे १०० किलोमीटर लांबीचा पूल तयार केला गेला आहे. तसेच २३० किलोमीटर रस्त्यावर पिलर तयार केले आहेत.
एनएचएसआरसीएलने म्हटले की, ४० मीटर लांब’फुल स्पॅन बॉक्स गर्डर्स’ आणि’सेगमेंटल गर्डर्स’ लाँचच्या माध्यमातून १०० किमी वायाडक्ट्सच्या निर्माणाचा मैलाचा दगड पार केला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर गुजरातमधील एकूण सहा नद्यांवर पुल बांधण्यात आले आहेत. यामध्ये वलसाड जिल्ह्यातील पार आणि औरंगा, नवसारी जिल्ह्यातील पूर्णा, मिंधोला, अंबिका आणि वेंगानिया यांचा समावेश आहे.
याशिवाय, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर ट्रॅक सिस्टिमसाठी ट्रॅक बेड टाकण्याचं कामही सुरतमध्ये सुरू झालं आहे. यासाठी जपानी शिंकानसेनमध्ये वापरल्या जाणार्या रिएन्फोर्स्ड काँक्रीटचा (आरसी) वापर केला जात आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण १.०८ लाख कोटी रुपये खर्च लागेल असा अंदाज आहे.
SL/KA/SL
24 Nov. 2023