NHAI आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्यात झाला सामंजस्य करार

 NHAI आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्यात झाला सामंजस्य करार

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तराखंडमध्ये बोगद्याचे बांधकाम कोसळल्याने ४१ मजुर अडकल्याच्या घटनेने बोगद्यांच्या बांधकामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.११ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत.यापुढे भविष्यात अशी दुर्घटना घडू नये म्हणून सावध भूमिका घेत NHAI देशातील सर्व बोगद्यांच्या कामाचे सेफ्टी ऑडीट करणार आहे. याकामासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडशी सामंजस्य करार केला आहे.

महामार्गांवरील बोगद्यांच्या बांधकामा दरम्यानची सुरक्षा आणि उच्च दर्जाच्या मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) देशभरातील सर्व 29 बांधकामाधीन बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट, अर्थात सुरक्षा लेखा परीक्षण करणार आहे.

एनएचएआय चे अधिकारी, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (DMRC) तज्ञांचे पथक तसेच इतर बोगदा तज्ञांसह बांधकाम सुरु असलेल्या बोगदा प्रकल्पांची पाहणी करतील आणि सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करतील. देशभरात विविध ठिकाणी एकूण सुमारे 79 किमी लांबीच्या 29 बोगद्यांचे बांधकाम सुरु आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशातील 12 बोगदे, जम्मू-काश्मीरमधील 06, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थानमधील प्रत्येकी 02 आणि मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांमधील प्रत्येकी एक बोगदा समाविष्ट आहे.

‘एनएचएआय’ ने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) बरोबरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरीही केली आहे. या कराराअंतर्गत, केआरसीएल एनएचएआयच्या प्रकल्पांना बोगद्याचे बांधकाम आणि उतार स्थिरीकरणाशी संबंधित आराखडा, रेखाचित्र आणि सुरक्षितते बाबतच्या पैलूंचे पुनरावलोकन करण्यासाठी सेवा प्रदान करेल. केआरसीएल बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट देखील करेल आणि आवश्यकता असेल तर, उपाय सुचवेल. या व्यतिरिक्त, केआरसीएल, एनएचएआय च्या अधिकाऱ्यांच्या क्षमता विकासाकरता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करेल. हा करार दोन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील.

SL/KA/SL

23 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *