RBI ने घातली Bajaj Finance वर कर्ज देण्यास बंदी
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :RBI ने मोठी कारवाई करत “बजाज फायनान्स” च्या दोन उत्पादनांवर तात्काळ बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.
बजाज फायनान्सला यापुढे eCOM आणि Insta EMI कार्डद्वारे कर्ज उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली जाणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 च्या कलम 45L(1)(a) अंतर्गत केंद्रीय बँकेने ही कारवाई केली आहे.
आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की बजाज फायनान्स डिजिटल कर्जाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असलेल्या तरतुदींचे पालन करण्यात अयशस्वी ठरले.
विशेषत: दोन उत्पादनांतर्गत कर्जदारांना डिजिटल कर्जाच्या संदर्भात कंपनीने मुख्य तथ्य वितरण न जाहीर केल्यामुळे आणि मुख्य तथ्य वितरणातील त्रुटींमुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विधानानुसार, वरील उणीवा दुरुस्त केल्यावर पर्यवेक्षी निर्बंधांचे रिव्यू केले जाईल. RBI bans lending to Bajaj Finance
SL/ KA/ SL
17 Nov. 2023