चीनने तयार केले जगातील सर्वांत वेगवान इंटरनेट नेटवर्क
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगातील सर्वच क्षेत्रांत सर्वोच्च स्थान पटकावण्याची ईर्षा असणाऱ्या चीनने आता
जगातील सर्वात प्रगत आणि वेगवान इंटरनेट नेटवर्क तयार केले आहे.
चीनने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सध्याच्या नेटवर्कपेक्षा ते कितीतरी पटीने वेगवान असल्याचा दावा केला जात आहे.
चीनी तंत्रज्ञान उत्पादक हुआवेई (Huawei) च्या मते, हे नेटवर्क इतके वेगवान आहे की एका सेकंदात या नेटवर्कवरून 150 चित्रपट डाउनलोड केले जाऊ शकतात.
10 पट जास्त स्पीड
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, हा इंटरनेटचा वेग सध्याच्या मोठ्या इंटरनेट स्पीडपेक्षा 10 पट जास्त आहे. या प्रकल्पावर चार कंपन्यांनी एकत्र काम केले आहे. यामध्ये सिंघुआ युनिव्हर्सिटी, चायना मोबाईल, हुआवेई टेक्नॉलॉजीज आणि सर्नेट कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. चीनी तंत्रज्ञान उत्पादक हुआवेई (Huawei) च्या मते, हे नेटवर्क 1.2 टेराबाइट्स (1200 गीगाबाइट) प्रति सेकंद वेगाने प्रवास करू शकते. China has built the fastest internet network in the world
या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत हुआवेई आणि चायना मोबाईलने अधिकृतपणे
चीनचे हे नेटवर्क जगातील सर्वात वेगवान इंटरनेट पुरवणारे नेटवर्क असल्याचे म्हटले आहे.
SL/KA/SL
17 Nov. 2023