मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण ते लवकरच कळेल

 मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण ते लवकरच कळेल

ठाणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला मुळातच आरक्षण मिळणार नाही , हे मी मनोज जरांगे पाटील यांना भेटून सांगितले होते. तरी ही जरांगे आंदोलन करीत आहेत, त्यांच्या पाठीमागे कोण आहे,त्याचा बोलवता धनी कोण ?हे कालांतराने कळेल असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे जातीपातीचे राजकारण करणारे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप आज ठाण्यात केला.It will be known soon who is Manoj Jarange’s Bolvita Dhani

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज, ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या
दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.या बैठकीत त्यांनी आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ठाणे, कल्याण, नवीमुंबई च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा असे सांगितले. तसेच मराठा आरक्षण, आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांचे नेते शहरात दौरे करून पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. याशिवाय सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणी करण्यात येत आहे. मनसेकडूनही अशाप्रकारची तयारी सुरू आहे. असे असतानाच ठाकरे यांनी नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ते शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली.

ML/KA/PGB
16 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *