या राज्यातून लवकरच धावणार देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो

 या राज्यातून लवकरच धावणार देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो

कोलकाता, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे कोलकातामधुन 31 डिसेंबर 2023 पासून धावणार आहे. जमिनीपासून 33 मीटर आणि हुगळी नदीच्या पृष्ठभागाच्या 13 मीटर खाली 520 मीटर लांबीच्या बोगद्यात दोन ट्रॅक टाकण्यात आले आहेत.

हावडा स्टेशन ते महाकरण स्टेशन असा 520 मीटर लांबीचा प्रवास मेट्रो एका बोगद्याद्वारे पूर्ण करेल. ट्रेन 80 किमी/तास या वेगाने फक्त 45 सेकंदांत बोगदा पार करेल. या बोगद्याद्वारे हावडा थेट कोलकात्याशी जोडला जाईल आणि दररोज 7 ते 10 लाख लोकांचा प्रवास सुकर होईल. 21 एप्रिल रोजी त्याची चाचणी घेण्यात आली.

या प्रकल्पासमोर दोन मोठी आव्हाने होती. प्रथम, खोदण्यासाठी योग्य मातीची निवड आणि दुसरे, कोलकातामध्ये दर 50 मीटरवर टीबीएमची सुरक्षितता. वेगवेगळ्या प्रकारची माती वेगवेगळ्या अंतरावर आढळते. बोगद्यासाठी योग्य जागा ओळखण्यासाठी 5-6 महिने माती सर्वेक्षणातच घालवले गेले, 3 ते 4 सर्वेक्षणानंतर हावडा पूल हुगळी नदीच्या पात्रापासून 13 मीटर अंतरावर खाली जमिनीत बोगदा तयार होऊ शकतो असे ठरले.

काही अंडरवॉटर मेट्रो मार्ग पूर्व-पश्चिम कॉरिडॉरचा (ग्रीन लाइन) भाग आहेत, ज्यामध्ये हावडा मैदान ते एस्प्लेनेड हा 4.8 किमीचा मार्ग तयार आहे. यात 4 भूमिगत स्थानके आहेत – हावडा मैदान, हावडा स्टेशन, महाकरण आणि एस्प्लेनेड. हावडा स्टेशन जमिनीपासून 30 मीटर अंतरावर आहे. हे जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. सध्या, पाण्याखालील मेट्रो मार्ग फक्त लंडन आणि पॅरिसमध्ये आहे.

कोलकातामधुन 1984 मध्ये देशातील पहिली मेट्रो ट्रेन धावली.आता सार्वजनीक वाहतुकीच्या एका नव्या पर्वाची सुरुवात कोलकाता शहरातून होणार आहे.

SL/KA/SL

13 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *