हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त!

 हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त!

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांनी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. उपाययोजनांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १६ विशेष वायु प्रदूषण नियंत्रण पथक तैनात केले आहेत.

पिंपरी- चिंचवड महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमध्ये शहरातील वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच मार्गदर्शक सूचनांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. महापालिकेने नव्याने लागू केलेल्या उपाययोजनांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १६ विशेष वायु प्रदूषण नियंत्रण पथक तैनात करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या पथकांमध्ये उपअभियंता, स्वच्छता निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि एमएसएफ कर्मचारी यांचा समावेश आहे.

ML/KA/PGB
8 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *