DGCA कडून AIR INDIA ला लाखोंचा दंड

 DGCA कडून AIR INDIA ला लाखोंचा दंड

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली : टाटा ग्रुपच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या एअर इंडियाला DGCA (डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) ने मोठा दंड ठोठावला आहे. Air India ला तब्बल १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासंदर्भातील DGCA ने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

DGCAनं म्हटलं की, विमान प्रवाशांचे हक्कांचं संरक्षण करणं आणि जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतीनुसार भारतातील एअरलाइन्स सुसंगत पद्धतीनं चालावीत याची आम्ही खात्री बाळगतो. त्यानुसार, डीजीसीएनं सन 2010 मध्ये CAR विभाग 3, मालिका M भाग IV प्रसिद्ध केलं होतं. त्यानुसार, उड्डाणांमध्ये येणारे अडथळे आणि विशेषतः नाकारलेल्या बोर्डिंग, फ्लाइट रद्द करणे आणि विलंब झाल्यास हवाई प्रवाशांसाठी योग्य संरक्षण देणं याचा यामध्ये समावेश आहे.
प्रवासी-केंद्रीत नियमांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी, DGCA नं मे 2023 पासून सतत विविध प्रमुख विमानतळांवर नियोजित देशांतर्गत विमान कंपन्यांची तपासणी केली. एअरलाइन्सच्या तपासणीदरम्यान, एअर इंडिया संबंधित CARच्या तरतुदींचं पालन करत नसल्याचं आढळून आलं आहे. त्यानुसार, कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. CARच्या तरतुदींचं पालन न केल्याबद्दल एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

हे लक्षात घेतलं पाहिजे की, यापूर्वी गेल्या वर्षीही प्रमुख विमानतळांवर अशाच प्रकारच्या तपासण्या केल्या गेल्या होत्या आणि एअर इंडियाने प्रवाशांच्या नाकारलेल्या बोर्डिंगवर CARच्या तरतुदींचं पालन न केल्यामुळं लाखो रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्यानुसारच, नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल एअर इंडियावर 10,00,000/- दंड आकारण्यात आला आहे, असं DGCAनं स्पष्ट केलं आहे.

SL/KA/SL

7 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *