अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीस आणला जाणारा 300 किलो पेक्षा अधिक खवा एफडीए कडून जप्त
मुंबई दि.4 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी निमित्त राजस्थान गुजरात या भागातून अवैधरित्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विक्रीस आणला जात असलेला खवा मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीनं अन्न आणि औषध प्रशासनानं ताब्यात घेतला आहे. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी मधल्या दापचरी इथं सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर शुक्रवारी रात्री खवा वाहतूक करणारी एक खाजगी ट्रॅव्हल बस अडवून मनसे कार्यकर्त्यांनी हा खवा अन्न आणि औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला.
गुजरात आणि राज्यस्थान मधून हा खवा मुंबई , पुणे , ठाणे या शहरांमध्ये लक्झरी बस मधून हा अवैध रित्या वाहतूक केला जात होता. या कारवाईत 300 किलो पेक्षा अधिक खवा ताब्यात घेण्यात आला असून अन्न आणि औषध प्रशासनासह पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
सध्या सणासुदीचे दिवस असून या काळात विविध प्रकारच्या मिठाई मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात. दिवाळी मध्ये तर विविध प्रकारच्या मिठायांची मागणी मोठी असते. अशा वेळी वेगवेगळया मिठाई बनवण्यासाठी खव्याची गरज असते. त्यामुळे भेसळ युक्त खवा मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असल्याच्या घटना समोर येतात.
या काळात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या इतर ठिकाणाहून खव्याची विक्री केली जात असल्याच्या बाबी सुद्धा समोर येत असतात. त्यामुळे आपण घेत असलेली मिठाई उत्तम प्रतीच्या खव्या पासून तयार केली गेली आहे का याची देखील एकडा तपासणी करायला हवी. आपण जी मिठाई खात आहोत ती आपल्या शरीरासाठी हानीकारक तर नाही ना ? या कड़े ही लक्ष द्यायला हवं.
SW/KA/SL
4 Nov. 2023