अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या वर्ल्ड कप मधून बाहेर

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला आता वर्ल्ड कपच्या उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. 19 ऑक्टोबर रोजी पुण्यात बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. यानंतर तो एकही सामना खेळू शकला नाही.
बांगलादेशविरुद्ध दुखापत झाल्यानंतर पांड्या 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यासाठी पुण्याच्या संघासोबत गेला नाही. तो पुण्याहून बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) गेला. सध्या एनसीएमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची रिकव्हरी सुरू आहे.
हार्दिक पांड्याने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये 6.84 च्या इकॉनॉमी रेटने 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 11 धावाही केल्या आहेत.
वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर हार्दिक पंड्याने प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर लिहलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो,”ही गोष्ट पचवणे फार अवघड आहे की मी वर्ल्डकपमधील उर्वरील मॅच खेळू शकणार नाही. पण मी पूर्णपणे टीम सोबत असेन आणि प्रत्येक मॅचमधील प्रत्येक चेंडूवर त्यांना प्रोत्साहन देईन. सर्वांना माझ्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिब्यांसाठी धन्यवाद. ही टीम खास आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करतील.”
बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी स्टॅडबाय म्हणून ३ खेळाडूंना निवडले होते. त्यात तिलक वर्मा, विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन आणि जलद गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा समावेश होता. बीसीसीआयकडे या ३ पैकी एकाची निवड करण्याचा पर्याय होता. यामधुन आता हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची वर्णी लागणार आहे. आता प्रसिद्ध हार्दिकची जागा कशी भरुन काढतो याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
SL/KA/SL
4 Nov. 2023