या आहेत देशातल्या सर्वांधिक दानशूर व्यक्ती

 या आहेत देशातल्या सर्वांधिक दानशूर व्यक्ती

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वाधिक दानशूर व्यावसायिकांची यादी EdelGive Hurun India Philanthropy ने जाहीर झाली आहे. HCL टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष शिव नाडर हे देशातील सर्वात मोठे दानशूर व्यावसायिक ठरले आहेत. त्यांनी एकूण २०४२ कोटी रुपयांची देणगी दिली, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ७६ टक्के अधिक आहे. शिव नाडर यांनी गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे.यावर्षीच्या आर्थिक वर्षात एकूण ११९ श्रीमंतांनी एकूण ८८४५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही रक्कम मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ५९ टक्के अधिक आहे.

EdelGive Hurun India Philanthropy List २०२३ नुसार, देशातील १० सर्वात मोठ्या अब्जाधीशांनी २०२३ मध्ये एकूण ५८०६ कोटी रुपयांची देणगी दिली. एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नाडर या यादीत पहिल्या स्थानी आहेत. २०२४ कोटी रुपयांनुसार त्यांनी दररोज ५.६ कोटी रुपये दान केले. त्यांच्यानंतर विप्रोचे मालक अझीम प्रेमजी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ज्यांनी १७७४ कोटी रुपयांची देणगी दिली.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी यावर्षी ३७६ कोटी रुपयांची मदत केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी आहे. या यादीत ते तिसरे सर्वात दानशूर व्यक्ती राहिले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांची संपत्ती या काळात दोन टक्क्यांनी वाढून ८.०८ लाख कोटी रुपये झाली आहे. दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय गौतम अदानी या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांनी २८५ कोटी रुपयांची देणगी दिली.

भारतातील दानशूरांची यादी

शिव नाडर- २०४२ कोटी

अजीम प्रेमजी – १७७४ कोटी

मुकेश अंबानी – ३७६ कोटी

कुमार मंगलम बिरला – २८७ कोटी

गौतम अडानी – २८५ कोटी

बजाज – २६४ कोटी

अनिल अग्रवाल – २४१ कोटी

नंदन निलेकानी – १८९ कोटी

अदार पूनावाला – १७९ कोटी

रोहिणी निलेकानी – १७० कोटी

SL/KA/SL

4 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *