घाटकोपर मध्ये आग ; एका महिलेसह दोघे होरपळले

घाटकोपर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): घाटकोपर पूर्वेकडील हिंगवाला रस्त्यावर असलेल्या सह्याद्री नगर कॉ.ऑप.सोसायटीच्या ११ मजली इमारतीला गुरुवारी दुपारी १.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका महिलेसह दोघे होरपळले. आगीत होरपळलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे Fire in Ghatkopar; Two including a woman fled
घाटकोपर पूर्व येथील पंतनगर, सह्याद्री नगर परिसरातील गणेश मंदिराजवळील ११ मजली इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील रूम नंबर ४०३ सदनिकेत गुरुवारी दुपारी १.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत दुपारी १.५३ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले.
या दुर्घटनेत सचिन शेलार (३७) आणि निर्मला शेलार (३६) हे दोघे होरपळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोघांना राजावाडी रुग्णालयात नेले. सचिन शेलार यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. निर्मला शेलार यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.
ML/KA/PGB
2 Nov 2023