कुरिअर बॉय आणि सेल्समन निघाले अट्टल चोरटे

ठाणे, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भिवंडी शहरामध्ये मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये प्रकर्षाने वाढ झालेली होती, यात दोघांचा पाठलाग करून त्यांच्या ताब्यातून रोकड आणि सोने हस्तगत करण्यात आले आहे.
चोरट्यांकडून 8 लाख 61 हजार रुपये किमतीचे 28 तोळे सोने, 50 हजार रुपये किमतीची एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
पद्मानगर भागात दोघे संशयित दुचाकी वरून जाताना आढळून आल्याने दोघांनी अटक केली आहे.
त्यांच्या जवळ चौकशी केली असता शहर पोलिस ठाणे हद्दीतील आठ आणि मानपाडा पोलिस ठाणे हद्दीतील एक अशा नऊ गुन्ह्यांची उकल झाली. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडलेले दोघे सोनसाखळी चोरटे हे सराईत गुन्हेगार असून सोनु गोविंद पाल या सेल्समन चा व्यवसाय करणाऱ्यावर विविध पोलिस ठाण्यात 19 तर कुरिअर बॉय म्हणून काम करणाऱ्या कमलाकर गपणत डोंगरे यावर नऊ गुन्ह्यांची नोंद आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे. The courier boy and the salesman turned out to be adamant thieves
ML/KA/PGB
2 Nov 2023