लाच घेणाऱ्या ED अधिकाऱ्याला अटक

 लाच घेणाऱ्या ED अधिकाऱ्याला अटक

जयपूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर ED च्या कारवायांची दशहत निर्माण झालेली असताना राजस्थानमध्ये ED च्या नावलौकिकाला धक्का बसेल अशी घटना घडली आहे. एका चिटफंड प्रकरणाता अटक न करण्यासाठी ईडी अधिकाऱ्याने १७लाखांची लाच मागितली होती. यातील १५ लाख रुपये घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. राजस्थान भ्रष्टाचार विरोधी पथकाने म्हणजेच एसीबीने ही कारवाई केली आहे.

राजस्थान एसीबीने ईडीचे अधिकारी नवलकिशोर मीना आणि त्याचा सहकारी बाबूलाल मीना यांना १५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ईडी इंस्पेक्टरच्या अनेक ठिकाणांवर एसीबी कारवाई करत आहे. एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

राजस्थान सध्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. हे सर्व सुरु असताना राज्यात ईडीकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. मात्र आता ED चा अधिकारीच लाच घेताता रंगेहात पकडल्या गेल्याने राज्यात खळबळ निर्माण झाली आहे.

SL/KA/SL

2 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *