स्वच्छ स्थानकाचा प्रथम पुरस्कार ठाणे स्थानकाला जाहीर

ठाणे दि २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वे मार्गावरील ऐतिहासीक ठाणे रेल्वे स्थानकाला स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांक मध्य रेल्वे जाहीर केला आहे. रेल्वे स्थानकाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यामागे चोवीस तास प्रयत्न केल्याचे हे फळ मध्य रेल्वेने दिले असून स्वच्छ आणि सुंदर रेल्वे स्थानक म्हणून प्रथम क्रमांक ठाणे रेल्वे स्थानकाला जाहीर करण्यात आला आहे.
रेल्वे प्रवाशांचे आरोग्य सुदृढ राहील या अनुषंगाने या स्थानकात सतत चोवीस तास साफसफाई करण्यात येत आहे. स्वच्छतेकडे ठाणे रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर केशव तावडे यांचे सतत असलेले लक्ष यामुळे हे स्थानक स्वच्छ आणि सुंदर राहत आहे.
तसेच स्थानक स्वच्छ तसेच सुंदर राखण्याचा प्रयत्न केला जात असल्याने याची दखल मध्य रेल्वेने घेवून रेल्वेच्या पाच क्षेत्रीय ४६६ स्थानकाच्या पाहणीत ठाणे स्थानकाला सर्वात स्वच्छ स्थानकाचा प्रथम क्रमांक जाहीर करण्यात येऊन गुणगौरव समारंभ कार्यक्रमात या ठाणे रेल्वे स्थानकाला स्वच्छ आणि सुंदर रेल्वे स्थानक म्हणून गौरवण्यात येणार आहे.
ML/KA/SL
27 Oct. 2023