भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाची नजर

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल ,वनस्पती व तूप इत्यादी अन्न पदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणी करायची विशेष मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम डिसेंबरपर्यत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उत्पादकांपासून ते किरकोळ दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या मिठाईच्या दुकानांमध्ये अथवा
उत्पादकांकडे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येईल ,त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला आहेत.
सणासुदीच्या काळात उत्सावादरम्यान बाजारात विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असतात. यामध्ये मोठया प्रमाणात खवा, दूध, खाद्यतेल, तूप यापासून तयार होणारे अन्नपदार्थ उपयोगात आणले जातात. पण मागणी जास्त आणि आवक कमी अशी परिस्थिती असल्यामुळे या काळात भेसळ करण्याचे प्रकार केले जातात. त्यामुळे सणासुदीच्या काळात होणारे भेसळीचे प्रकार टाळण्यासाठी मिठाई विक्रेत्यांना काही मार्गदर्शन सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेत,असे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. Food and Drug Administration’s eye on adulterants
ML/KA/PGB
26 Oct 2023