स्वस्तात खरेदी करा १४ सीटर कार

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या कुटुंबाला प्रवासाला जाण्यासाठी किंवा मित्रमंडळी एकत्र ट्रिपला जाण्यासाठी मोठ्या कारची गरज असते. ट्रिपच्या मजामस्तीच्या वातावरणात एकाच गाडीतून प्रवास करणे आनंददायी असते. मात्र हा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा म्हणून कोणत्या गाडीची निवड करावी हा प्रश्न नेहमीच पडतो. तर आता १४ आसन क्षमता असलेली डिझेलवर चालणारी स्वस्तात मस्त कार बाजारात दाखल झाली आहे. Force Traveller 3350 Super ही १४ सिटर कार ग्रुपने प्रवास करण्यासाठी अगदी योग्य आहे.
मोठ्या कुटुंबासाठी कार खरेदी करताना बर्याचदा लोक आठ साटर कारसाठी सरासरी १५ ते २५ लाख रुपये मोजतात. पण Force Traveller 3350 Super ही १४ सिटर कार तुम्ही फक्त ११ लाख रुपयांच्या खरेदी करू शकता. २५९६ सीसी इंजिन आणि ७० लिटर इंधन क्षमता असलेल्या या वाहनात चार सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १४० bhp पॉवर आणि ३२० Nm टॉर्क निर्माण करत असून या वाहनात १४ लोक बसण्याची क्षमता आहे.
डिझेल इंजिन असलेली ही कार १३ किलोमीटर प्रति लीटर पर्यंत सहज मायलेज देते. या गाडीमध्ये उत्तम एअर कंडिशन सुविधा आहे. या कारची किंमत ११ लाख रुपयांपासून १४ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
SL/KA/SL
26 Oct. 2023