कॅनडासाठी Visa सेवा पुन्हा सुरू

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत व कॅनडामधील गढुळलेले संबंध आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. राजनैतिक संघर्ष निवळण्याच्या दृष्टीने भारताने पाऊल टाकले आहे. भारताचा व्हिसा देणारी कॅनडामधील सेवा केंद्रे आज (दि. २६) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ‘सुरक्षा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर व कॅनडाच्या प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडामधील व्हिसा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये प्रवेश व्हिसा, व्यवसाय व्हिसा, वैद्यकीय व्हिसा आणि कॉन्फरन्स व्हिसाचा समावेश आहे’, असे ओट्टावा येथील भारतीय उच्चायुक्तालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले. यामुळे ओट्टावा, टोरंटो व व्हॅनकुवर शहरांमधील भारतीय दूतावासामध्ये कॅनडातील नागरिकांना व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. असून, कॅनडाने आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत घेऊन जावे, असेही भारताने सांगितले होते.
‘देशांतर्गत बाबींमध्ये कॅनडाच्या अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांतील संबंध सध्या अवघड टप्प्यातून जात आहेत’, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. कॅनडामध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची हमी मिळाली, तर भारत सरकार कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणे सुरू करील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
SL/KA/SL
26 Oct. 2023