दीक्षाभूमीवर झाली सामुहिक बुध्द वंदना…

नागपूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आज नागपुरातील दीक्षाभूमी येथे सायंकाळी होणार आहे…त्या निमित्त दीक्षाभूमी येथे मुख्य स्टेज समोर आज सकाळी दीक्षाभूमी स्मारक समिती आणि समता सैनिक दलातर्फे सामूहिक बुध्द वंदना घेण्यात आली. यावेळी हजारो बौध्द अनुयायी उपस्थित होते.. Collective worship of Buddha was held at Diksha Bhoomi…
भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा नेतृत्त्वात भिक्खु संघातर्फे हा सामुहिक बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला….त्या नंतर 21 प्रतिज्ञाचे वाचन करुन समता सैनिक दल आणि शाक्य संघातर्फे सलामी देऊन बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांचा जयघोष करण्यात आला…
ML/KA/PGB
24 Oct 2023