श्री करवीर निवासिनीची महिषासुरमर्दिनी रूपामध्ये पूजा

कोल्हापूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शारदीय नवरात्र उत्सवाच्या उत्सवातील प्रमुख दिवस असलेल्या जागरादिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली आहे. रविवारी देवीचा जागर असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली आहे .दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लांबवर गेल्या होत्या.
दरम्यान रविवारी देवीचा जागर असल्याने पारंपरिक महिषासुरमर्दिनी रुपातील पूजा बांधली आहे. देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी त्रिशूल उगारला असून ती महिषासुराचा वध करत आहे अशी पूजा बांधण्यात आली आहे. देवीच्या जागरा दिवशी भाविकांकडून दिव्याला तेल अर्पण करण्याची प्रथा आहे.
जागरा दिवशी तेल घालण्यासाठी कोल्हापूर जिल्हासह राज्यातील कानाकोपऱ्यातून, कर्नाटक सीमाभागातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.त्यामुळे मंदिर भाविकांनी तुडुंब भरले आहे. दर्शनाची मुख्य रांग सरलष्कर भवन, शेतकरी संघातील दर्शन रांग ओलांडून भवानी मंडपात गेली होती.
ML/KA/SL
22 Oct. 2023