पोलीस स्मृतीदिनाच्या निमित्ताने अभिवादन

पुणे, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोलीस स्मृती दिनाच्या निमित्ताने पुण्यात आज पुणे पोलीस यांच्या वतीने पोलीस स्मृतिदिन संचलनाचे आयोजन पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्र परिसरात करण्यात आले होते. यावेळी नॅशनल डिफेन्स अकॅडमी चे वाईस ऍडमिरल अजय कोचर यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली आणि शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले . यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी शहिदांना बंदुकीच्या तीन फेरी झाडत अभिवादन केले… याप्रसंगी पोलीस दलातील आजी-माजी अधिकारी देखील उपस्थित होते.
ML/KA/SL
21 Oct. 2023