‘तेज’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर पडणार असा प्रभाव

 ‘तेज’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर पडणार असा प्रभाव

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना अरबी समुद्रात ‘तेज’ हे चक्रीवादळ दाखल होत आहे. संभाव्य चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात वातावरण बदलण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. पश्चिम अरबी समुद्रात २० ते २१ ऑक्टोबर पर्यंत चक्रीवादळ प्रभावी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग वाढता असणार आहे. व त्यानंतर किनारपट्टी परिसरात ५० ते ६० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत दक्षिण-पूर्व आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात समुद्राच्या उष्ण तापमानामुळे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.दरम्यान हवामान विभागाकडून मच्छिमारांना महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर २० ते २३ ऑक्टोबर दरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

स्कायमेटच्या हवामान अंदाजानुसार अरबी समुद्रात वादळाची मोठी शक्यता आहे. अग्नेय अरबी आणि लगतच्या प्रदेशांवर असणारे कमी दाबाचे क्षेत्र एकवटले आहे. हे क्षेत्र किनाऱ्याहून १००० किमी अंतरावर असून अरबी समुद्राावरून पश्चिम वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. २१ ऑक्टोबरला हा कमी दाब तीव्र होऊन त्यानंतर २४- ३६ तासांत चक्रीवादळात त्याचे रुपांतर होण्यास वाव असल्याचेही वर्तवण्यात आले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात विकसित होणाऱ्या ‘तेज’ चक्रीवादळाचा थेट परिणाम मुंबईवर होईल असे बोलले जात आहे. यामुळे मुंबईला हाय अलर्ट देण्यात आला. राज्यात एका बाजूला तापमानात कमालीची वाढ होत असून मॉन्सूनने देशातून माघार घेतली आहे.

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात उष्ण तापमानामुळे चक्रीवादळांची निर्मीती ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत होत असते. दक्षिण पूर्व आणि लगतच्या दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र १९ ऑक्टोबर रोजी त्याच क्षेत्रावर कायम राहणार आहे. ते जवळजवळ पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकण्यासाठी २१ ऑक्टोबर रोजी दाबामध्ये तीव्र होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

SL/KA/SL

20 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *