चालू आर्थिक वर्षात 1.36 लाख कोटींची GST चोरी प्रकरणे

नवी दिल्ली. दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : GST चोरी रोखण्यासाठी अर्थ मंत्रालय आता कठोर कारवाई मोहिम हाती घेतली आहे. बिले तयार करण्यासह इतर मार्गांनी व्यापारी GST चुकवत असल्याचे आढळून आले आहे. चालू आर्थिक वर्षात १.३६ लाख कोटी रुपयांची चोरी उघडकीस आल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १४ हजार कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटची एकूण १०४० प्रकरणे उघडकीस आली असून त्यात आतापर्यंत ९१ जणांना अटक करण्यात आली आहे.२०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण १.३६ लाख कोटी रुपयांची जीएसटी चोरी आढळून आली आहे, ज्यामध्ये बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचाही समावेश आहे आणि लोकांनी स्वेच्छेने 14,108 कोटी रुपये जमा केले आहेत.
GST गुप्तचर महासंचालनालयाने GST चोरी शोध मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दाव्यांची प्रकरणे शोधून काढली आहेत. डीजीजीआयने गेल्या साडेतीन वर्षांत 57,000 कोटी रुपयांची जीएसटी चोरी शोधली असून या प्रकरणात 500 जणांना अटकही करण्यात आली आहे.
जून २०२३ मध्ये, DGGI ने देशभरातील सिंडिकेटचे मास्टरमाइंड ओळखून त्यांना अटक करण्यावर भर दिला होता. तांत्रिक साधनांद्वारे डेटा अॅनालिटिक्सचा वापर करून GST चुकवणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हे टॅक्स सिंडिकेट अनेकदा साध्याभोळ्या सामान्य लोकांचा वापर करतात आणि त्यांना नोकरी, कमिशन, बँक कर्ज देण्याचे आमिष दाखवतात आणि त्यांच्याकडून केवायसी कागदपत्रे घेतात ज्याद्वारे त्यांच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय बनावट, शेल फर्म किंवा कंपन्या उघडल्या जातात.
SL/KA/SL
19 Oct. 2023