Nestle India कडून भागधारकांसाठी उत्साहवर्धक बातमी

 Nestle India कडून भागधारकांसाठी उत्साहवर्धक बातमी

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या निमित्ताने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. मॅगीच्या उत्पादनामुळे घरोघरी पोहोचलेल्या Nestle India या कंपनीने भागधारकांसाठी डिविडंड जाहीर केला आहे. त्याचबरोबर, शेअर स्प्लिट करण्यासही कंपनी बोर्डानं मंजुरी दिली आहे. ग्राहकोपयोगी उत्पादनाच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या नेस्ले इंडियाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत उत्तम कामगिरी केली आहे. नेस्ले इंडियाच्या जोरदार कामगिरीमुळं कंपनीच्या शेअरचा भावही वधारला आहे. आज एकाच दिवसात एनएसईवर नेस्लेनं तब्बल ३.५१ टक्क्यांची वाढ नोंदवली. रुपयांच्या भाषेत शेअर तब्बल ८१७.०५ रुपयांनी वाढला. नेस्ले इंडियाच्या शेअरचा सध्याचा भाव २४,०८० रुपये आहे.

कंपनीला या तिमाहीअखेर तब्बल ९०८ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीशी तुलना करता हा नफा तब्बस ३७.२७ टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला ६६१.४६ कोटी इतका नफा झाला होता.

निकालानंतर कंपनीच्या संचालक मंडळानं भागधारकांना एका शेअरमागे १४० रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. हा लाभांश पात्र भागधारकांच्या खात्यात १६ नोव्हेंबरपासून जमा होईल. याशिवाय, १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचे १० भाग करण्यास कंपनीच्या संचालक मंडळानं मंजुरी दिली आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तीकडं आता नेस्ले इंडियाचे १० शेअर असतील, तर ते थेट १०० होणार आहेत.

SL/KA/SL

19 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *