प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर

सांगली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुप्रसिद्ध अभिनेते, नाट्यनिर्माते प्रशांत दामले यांना यंदाचा विष्णूदास भावे पुरस्कार
जाहीर करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनी प्रशांत दामले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. गौरवपदक, रोख रक्कम 25 हजार, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ अस या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अखिल महाराष्ट्र नाट्य विध्यामंदिर समिती मार्फत गेली 55 वर्ष हा पुरस्कार
दिला जातो. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष शरद कराळे यांनी यंदाच्या
पुरस्काराची घोषणा केली आहे. रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलावंतांना विष्णूदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदा समारंभाचे हे 55 वे वर्ष आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर संस्था मागील 80 वर्षांपासून नाट्यक्षेत्रात कार्यरत आहे.
यापूर्वी हा पुरस्कार बालगंधर्व, आचार्य अत्रे,
पु. ल. देशपांडे, विठाबाई नारायणगावकर, प्रभाकर पणशीकर, वसंत कानेटकर, विक्रम गोखले, डॉ. श्रीराम लागू, मोहन वाघ, निळू फुले, दिलीप प्रभावळकर, फय्याज शेख, अमोल पालेकर, डॉ. जब्बार पटेल, रोहिणी हट्टंगडी आदींसह अन्य मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे. Vishnudas Bhave Gaurav Award announced to Prashant Damle
ML/KA/PGB
17 Oct 2023