स्वच्छ हवा कार्यक्रम

 स्वच्छ हवा कार्यक्रम

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  धूळ नियंत्रित करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या आदेशानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये सात कलमी कार्यक्रम जाहीर केला. एप्रिल मध्ये तीन कृती दले स्थापन झाली. बांधकामांच्या ठिकाणी त्रुटी आढळल्यास, नियमांचे पालन न करणाऱ्या विकासक, कंत्राटदारावर कारवाई असे स्वरूप ठरले. पण त्याची नियमावली करण्याचे आदेश काढायला पालिकेला नऊ महिने लागले आहेत. आता नियमावली, शिक्षेच्या तरतुदी करण्याचे काम सुरू होईल.

पालिकेने स्वच्छ हवा कार्यक्रम तयार केला, तेव्हा डॉ. संजीव कुमार अतिरिक्त आयुक्त होते. त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी आलेले डॉ. श्रावण हर्डीकर दीड महिन्यातच बदलून गेले. त्यामुळे नऊ महिने रखडलेले काम मार्गी लावण्याची जबाबदारी काही दिवसापूर्वी आलेल्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे आली आहे.

त्यांनीच आता पुढाकार घेत या कामाला वेग देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी झालेल्या बैठकीत खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तात्काळ उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कठोर कारवाई करण्यावर चर्चा झाली. वॉर्डस्तरावर टास्क फोर्स, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक नेमा, त्यात सहाय्यक आयुक्त, सहाय्यक अभियंते यांचा समावेश करा, असे आदेश आयुक्त आय. एस. चहेल यांनीही दिले आहेत.clean air program

ML/KA/PGB
17 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *