राज्यात रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मिशन

 राज्यात रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मिशन

ठाणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच जास्तीत जास्त उद्योजक निर्माण होण्यासाठी राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन” च्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाले. पहिल्या टप्प्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्याचाही समावेश आहे.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तथा ग्लोबल अलायन्स फॉर इंटरप्रोन्यूरशिप (गेम) यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर ठाणे जिल्ह्यासह अमरावती, जळगाव, अहमदनगर, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज फडणवीस यांच्या हस्ते झाला.

यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे कौशल्य, रोजगार, उद्योजकता , नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, गेमचे संस्थापक रवि व्यंकटेशन, कौशल्य विकास आयुक्त रामास्वामी एन. तसेच ठाणे जिल्ह्यातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता , नाविन्यता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे आदी उपस्थित होते.

भांडवलासोबतच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, उद्योजक अशी साखळी निर्माण करुन जागतिक संधी प्राप्त करण्यास महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन सहाय्यभूत ठरेल आणि राज्य विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगामध्ये अधिक भांडवल आणि कौशल्य आणले आहे. यालाच पूरक व्यवस्था महाराष्ट्रात तयार करण्यासाठी “महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन” सुरु करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात हा कार्यक्रम नागपूरसह, ठाणे, अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर आणि जळगाव या 6 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

वर्ष 2024 अखेरीस राज्यातील 50 टक्के जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ‘Maharashtra State Entrepreneurship Mission’ to be implemented in Thane district

ML/KA/PGB
16 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *