दीक्षाभूमीवर महामानवाला अनुयायी करताहेत अभिवादन

नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांना नागपुरातील पवित्र दीक्षाभूमी येथे दीक्षा देवून धम्म क्रांती घडविली होती. या धम्मचक्र प्रर्वतनाचा 67 वा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. डॉ. बाबासाहेबांनी अशोक विजया दशमी दिनी धम्मचक्र प्रर्वतन केल्याने परंपरेनुसार दसर्याला हा सोहळा साजरा केला जातो पण तारखेचे ही महत्त्व आहे. Followers greet the great man on his initiation
आज तारखेचे महत्त्व लक्षात घेता हजारो अनुयायांनी नागपुरातील पवित्र दीक्षाभूमी येथे येऊन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळ पासूनच दीक्षाभूमी येथे अनुयायांनी गर्दी केलेली दिसत होती. 24 ऑक्टोबर रोजी अशोक विजया दशमी दिनी मुख्य सोहळा पवित्र दीक्षाभूमी येथे साजरा करण्यात येणार आहे.
ML/KA/PGB
14 Oct 2023