महागाईतून दिलासा! महागाई दर 5.02 टक्क्यांवर घसरला

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे सप्टेंबर 2023 मध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये 5.02 टक्क्यांवर आली आहे, जी ऑगस्टमध्ये 6.83 टक्के होती. यापूर्वी जुलै मध्ये किरकोळ महागाई 7.44 टक्क्यांच्या 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली होती.
गेल्या 2 महिन्यांत महागाई वाढण्याचे कारण म्हणजे टोमॅटो, कांदा आणि इतर भाज्यांच्या किमतीत वाढ. मात्र, आता सरकारने महागाई आटोक्यात आणण्यासाठी सर्व व्यवस्था केल्याने यावेळी किरकोळ महागाई दर पाच टक्क्यांवर आला आहे.
सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात अन्नधान्याच्या महागाई दरात मोठी घट झाली आहे. अन्नधान्य महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 6.56 टक्क्यांवर आला, जो ऑगस्टमध्ये 9.94 टक्के होता. मात्र, महागाईने ग्रामीण भागातील लोकांनाही हैराण केले आहे. ग्रामीण भागात किरकोळ चलनवाढीचा दर ५.३३ टक्के आहे, तर अन्नधान्य चलनवाढीचा दर ६.६५ टक्के आहे. Relief from inflation! Inflation rate fell to 5.02 percent
ML/KA/PGB
12 Oct 2023