राष्ट्रवादी पक्ष कोणाचा , पुढील सुनावणी नऊ नोव्हेंबर रोजी

 राष्ट्रवादी पक्ष कोणाचा , पुढील सुनावणी नऊ नोव्हेंबर रोजी

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह कोणाचे?’ या वादावर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची निवडणूक आयोगा समोर आज दुसरी सुनावणी पार पडली. त्यानंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अजित पवार गटाकडून चुकीची माहिती देऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्या वकिलांना फटकारलं असून आज सुनावणी स्थगित करण्यात आली. याबाबाबतची पुढची सुनावणी आता ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये ९ हजार त्रुटी आढळून आलेल्या आहेत. कमी वेळेत आम्ही एवढ्या त्रुटी शोधल्या. आणखी पुरावे देण्यासाठी आणि म्हणणं मांडण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे. त्यामुळे सुनावणी एक महिन्यानंतर ठेवली आहे. आजच्या सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांचं म्हणणं संपलेलं आहे.

आयोगात सुरु असलेल्या सुनावणीमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे थेट शरद पवारांना उद्देशून आक्षेप घेतले गेले. शरद पवारांनी पक्ष घरासारखा चालवला, पक्षामध्ये नियमांचं पालन केलं जात नव्हतं, असं अजित पवार गटाच्या वकिलांनी नमूद केलं.
शरद पवारांच्या कथित एकाधिकारशाहीचा मुद्दा अजित पवार गटाकडून पुन्हा अधोरेखित करण्यात आला.

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंघवी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अजित पवार गटाकडून चुकीची माहिती देऊन प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने हे प्रकरण ९ नोव्हेंबरला ठेवलं आहे. आम्हाला म्हणणं मांडण्यासाठी कमी वेळ मिळालेला असतानाही आम्ही ९ हजार प्रतिज्ञापत्रांमधअये त्रुटी काढलेल्या आहेत.

SL/KA/SL

9 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *