हक्काच्या सुसज्ज स्मशानभूमी साठी नागरिक उतरले रस्त्यावर ..

 हक्काच्या सुसज्ज स्मशानभूमी साठी नागरिक उतरले रस्त्यावर ..

ठाणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेली जवळपास पाच दशके कोपरीकरांना एकच हक्काची स्मशानभूमी होती परंतू ती देखील एका खाजगी ट्रस्टच्या ताब्यात देण्याचे कटकारस्थान सध्या कोपरीमध्ये शिजत असल्याने कोपरीकर त्रस्त झाले आहेत. शासनाचा कोट्यवधींचा निधी वापरून स्मशानाच्या जागेतील एका भागात तीन मजली इमारत बांधण्याचा घाट घातल्याचा निषेध करत आज मोठ्या संख्येने कोपरीकर रस्त्यावर उतरले आणि एका मोठ्या जनजागर रॅलीचे आयोजन केले . या जनजागर रॅलीमध्ये मोठ्या संख्येने स्थानिक स्त्री-पुरुष सामील झाले होते.

ठाणे पूर्व भागातील जवळपास पंधरा हजार लोक वस्ती असून त्यांना एकच सर्व धर्मीय स्मशानभूमी उपलब्ध आहे. या स्मशानभूमीचा वापर ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा, कोपरी कॉलनी, कोपरी गाव तसेच आनंदनगर तसेच थेट मेंटल हॉस्पिटल पर्यंतच्या भागातील नागरिक करतात. स्थानिक समाजसेवक विष्णू ठाणेकर यांनी ही आपली खाजगी जमीन लोकहित लक्षात घेऊन पालिकेच्या ताब्यात दिली होती जेणेकरून तिथे एक सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात यावी. परंतू गेली पन्नास वर्षे अस्तित्वात असलेले या स्मशानभूमीचा ताबा एका खाजगी ट्रस्टने घेऊन ठेवला होता ज्यामुळे नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या स्मशानभूमीमध्ये शव जाळण्यासाठी लाकडे मोफत मिळत असून येथे मात्र हजार रुपये वसूल केले जातात. त्या व्यतिरिक्त तिथे लहान मुलांसाठीची एकमेव दफनभूमी असल्याने या स्मशानभूमीला महत्त्व प्राप्त झाले आहे. Citizens took to the streets for a well-equipped cemetery.

विजेवर दहन करण्याची कोणतीही सुविधा इथे नसल्याने मोठ्या प्रमाणात लाकडे वापरली जातात. परंतु गेल्या काही वर्षात एका विशिष्ट समाजाच्या ताब्यात असलेल्या या ट्रस्टने पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संधान बांधून तब्बल साडेबारा कोटींचा निधी मंजूर करून घेतला तळ अधिक तीन मजल्यांचे इमारत बांधण्याचा घाट घातला. सदरची इमारत ही प्रार्थनेसाठी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याचा येथील स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला असून जवाहर बाग आणि वागळे इस्टेट स्मशानभूमी सारखेच सुसज्ज अद्ययावत अशी स्मशानभूमी येथे उभारावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ML/KA/PGB
7 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *