जहाल नक्षल महिलेने पोलीसांसमोर केले आत्मसमर्पण…

 जहाल नक्षल महिलेने पोलीसांसमोर केले आत्मसमर्पण…

गडचिरोली, दि. ७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकरा लाख रुपयांचे बक्षीस असलेली जहाल नक्षल महिलेने आज गडचिरोली पोलीसापुढे आत्मसमर्पण केले . रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी, (वय २८) असे आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षल महिलेचे नाव आहे.

रजनी उर्फ कलावती संमय्या वेलादी रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) येथील रहिवासी असून तिच्यावर खून चकमक आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर ११ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले. असून आतापर्यंत ५८६ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली आहे.

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत नक्षल्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचारांच्या जीवनाला कंटाळून आत्मसमर्पण केले. रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी ही ऑगस्ट २००९ ला फरसेगड दलममध्ये सदस्या पदावर भरती होऊन सन २०१० पर्यंत कार्यरत होती.त्यानंतर सन २०१० ला ओरच्छा दलममध्ये बदली होऊन सन २०१३ पर्यंत कार्यरत होती.सन २०१३ ला नॅशनल पार्क एरीया डॉक्टर टीममध्ये बदली होऊन एसीएम (एरीया कमीटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन सन २०१५ पर्यंत ती कार्यरत होती.सन २०१५ ला तिची सांड्रा दलममध्ये बदली होऊन आजपर्यंत कार्यरत होती.२०१९ ते २०२३ या कालावधीत आतापर्यंत विविध गुन्ह्याची नोंद आहे.

ज्या नक्षलवाद्याना विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छा असेल त्यांना लोकशाहीत सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

ML/KA/SL

7 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *