वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात एकवटले दापोली तालुक्यातील शेतकरी

 वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात एकवटले दापोली तालुक्यातील शेतकरी

दापोली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माकडे, वानरे, रानडुकरे अशा वन्यप्राण्यांच्या शेतीला होणाऱ्या उपद्रवामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना आज तहसिलदार कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत आपले ग्राऱ्हाणे मांडणारे निवेदन सादर केले.

माकडांना गोळ्या घाला नाहीतर आम्हाला घाला, डुकरांना गोळ्या घाला नाहीतर आम्हाला घाला,जय जवान जय किसान, अशा शेतकऱ्यांच्या घोषणांनी तहसिलदार कार्यालय परिसर भरून गेला होता. यावेळी उपद्रवी प्राणी म्हणून कॅटॅगरी सी मध्ये वर्गीकृत करण्यात आलेल्या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी प्रामुख्याने पुढील मागण्या शासनापुढे मांडण्यात आल्या.

वन्यप्राण्यांमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई रक्कम ३० दिवसांमध्ये मिळायला पाहीजे,

तक्रार केल्यानंतर ७ दिवसात पंचनामा झाला पाहीजे.

उपद्रव करणाऱ्या वन्य प्राण्यांना मारण्याची परवानगी द्या.

अन्यथा एकरी ७० हजार रुपये नुकसान भरपाई द्या.

वरील मागण्यापूर्ण न झाल्यास राज्यभर तीव्र आदोलन हाती घेणार असल्याचे यावेळी आंदोलनाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

संतोष महाजन , विनायक महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे धडक आंदोलन करण्यात आले.वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला आवर घालण्यासाठी शासनाने कोकणातील आमदारांची एक समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त होऊन ही त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे वानर, माकड , रानडुक्कर , साळिंदर आदी वन्यप्राण्यांच्या त्रासाने नाडलेला शेतकरी आपणाला कोणीच वाली नाही अशा मानसिकतेत आहे, त्याचा राग आज या आंदोलनात व्यक्त केला गेला.

SL/KA/SL

5 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *