Asian Games- भारताच्या खात्यात आज ३ सुवर्ण पदके जमा, एकूण पदकसंख्या ८६

 Asian Games- भारताच्या खात्यात आज ३ सुवर्ण पदके जमा, एकूण पदकसंख्या ८६

गाउंझाऊ, दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरु असलेल्या स्पर्धेत आजच्या १२ व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी ३ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. २१ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ३ कांस्य अशी भारताने आजपर्यंत Asian Games मध्ये ८६ पदके जिंकली आहेत. तसेच पदकतालिकेत चौथे स्थान कायम राखले आहे.

भारताने तिरंदाजीत सुवर्णपदक कमावत खातं उघडलं होतं. त्यानंतर स्क्वॉश मिक्समध्ये भारताला सुवर्ण मिळालं. त्यानंतर आता पुरुष कंपाऊंट टीमने देखील तिरंदाजीत सुवर्णपदक नावावर केले.

भारतीय पुरुष कंपाऊंट टीममधील प्रवीण देवताले, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर यांनी २१ वे सुवर्ण आपल्या नावावर केले. भारतीय टीमने फायनलमध्ये दक्षिण कोरियाचा पराभव केला. भारताला तिरंदाजीत मिळालेलं हे तिसरे सुवर्णपदक आहे.

स्क्वॉश मिक्स डबल इवेंटमध्ये भारताच्या दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल संधू यांच्या जोडीने सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. दुसरीकडे बॅडमिंटनमध्ये एचएस प्रणॉयने पुरुष एकेरी स्पर्धेत आपले पदक निश्चित केले आहे.

पदकांच्या संख्येत भारत आशियाई देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्या क्रमांवर जापान तर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया हे देश आहेत. चीनने १७६ सुवर्णपदकासह एकूण ३२६ एकूण पदकं जिंकली आहेत. जापानने ३९ सुवर्ण आणि एकूण १५० पदकं नावावर केलीयेत. तर दक्षिण कोरियाने ३३ सुवर्ण पदकांसह एकूण १५४ पदकं जिकली आहेत.

याआधीच्या Asian Games मध्ये भारताने एकूण ७० पदके जिंकत पदकतालिकेत आठवे स्थान मिळवले होते. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या स्पर्धेतील भारताची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे.

SL/KA/SL

5 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *