Asian Games- एकूण ८१ पदकांसह, भारत पदतालिकेत चौथ्या स्थानी
गाउंझाऊ, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरु असलेल्या स्पर्धेत आजच्या ११ व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी अक्षरश:पदकांची लूट केली आहे. आज दिवसभरात विविध क्रीडा प्रकारांत भारताने तब्बल १२ पदके जिंकत पदकतालिकेत ४ थे स्थान कमावले आहे. १८ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ३२ कांस्य अशी भारताने आजपर्यंत Asian Games मध्ये ८१ पदके जिंकली आहेत. तर चीन, जपान आणि कोरिया हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. याआधीच्या Asian Games मध्ये भारताने एकूण ७० पदके जिंकत पदकतालिकेत आठवे स्थान मिळवले होते. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या स्पर्धेतील भारताची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे.
भारतीय खेळाडूंची आजची कामगिरी
भारताचा स्टार खेळाडू नीरज चोपडाने पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. तर किशोर जेना याने भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकलं आहे.
ज्योती वेणम आणि ओजस देवतळे यांच्या मिश्र संघाने कंपाऊंड तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावले आहे
अनस मुहम्मद याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने २०२३मध्ये पुरुषांच्या ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले. तर महिलांच्या विथ्या रामराज, ऐश्वर्या, कैलाश मिशांच्या संघाने पदक जिंकले. प्राची आणि सुभा वेंकटेशन यांनी ४×४०० मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकले.
भारताचा कुस्तीपटू सुनिल कुमारने 87 किलो वजनीगटात रौप्य पदक जिंकले. त्याने कझाकिस्तानच्या अटबेकचा पराभव केला.
भारतीय पुरूष हॉकी संघाने सेमी फायनल सामन्यात कोरियाचा 5 – 3 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. याचबरोबर भारताचे रौप्य पदक निश्चित झाले आहे.
अविनाश साबळे याने आज ५००० मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. तर हरमिलन बैंसने ८०० मीटरमध्ये रौप्यपदक पटकावले आहे.
मंजू राणी आणि राम बाबू यांनी ३५ किमी रेस वॉक मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला दिवसातील पहिले पदक मिळवून दिले. या जोडीने कांस्यपदक जिंकले.
स्क्वॉश मिश्र दुहेरीमध्ये अनहत सिंह आणि अभय सिंह यांनी कांस्यपदक जिंकले.
महिला बॉक्सर परवीनने देखील 57 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले.
SL/KA/SL
4 Oct, 2023