विश्वचषक क्रिकेटचा उद्घाटन सोहळा रद्द
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्यापासून भारतात सुरु होणाऱ्या एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा आज होणारा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा सोहळा रद्द करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आयसीसी (ICC) किंवा बीसीसीआय (BCCI) ने देखील याबाबत अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिलेलं नाही. उद्यापासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे विश्वचषकाला सुरुवात होत आहे.
यापूर्वी BCCI ने विश्वचषक सुरू अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium, Ahmedabad) वर भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केल्याची बातमी समोर आली होती. 4 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार होता. भारतरत्न माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते विश्वचषकाचं उद्घाटन पार पडणार होतं. या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकार आणि संगीतकार यांच्या उपस्थिती राहणार होते. मात्र, आता हा उद्घाटन सोहळा रद्द झाल्याने क्रिकेट प्रेमींची विशेषत: भारतीयांची निराशा झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयने अद्याप यासंबंधित अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही.
दरम्यान उद्या (दि.५) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझिलँड याच्यामध्ये या स्पर्धेतील पहिला सामना होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये पावसाचा वारंवार व्यत्यय आल्यामुळे सामने रद्द करावे लागले होते. यामुळे उद्याच्या विश्वचषकाचा पहिला सामना सुरळीत पार पडतो ना याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. १९ नोव्हेंबर रोजी विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.
यंदाच्या विश्वचषकात १० संघ सहभागी आहेत. त्यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगानिस्तान, दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि नेदर्लंड्स संघाचा समावेश आहे.
SL/KA/SL
4 Oct. 2023