Asian Games: यशस्वी जैस्वालची ऐतिहासिक खेळी
गाउंझाऊ, दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालने इतिहास रचला आहे. भारताच्या या युवा सलामीवीर फलंदाजाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्यात शतक झळकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. पुरुष क्रिकेटच्या उपांत्यपूर्व फेरीच्या नेपाळविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जैस्वालने ही धडाकेबाज खेळी केली आहे.
SL/KA/SL
3 Oct. 2023