महाप्रसादातून ७० जणांना विषबाधा; एका चिमुकलीचा मृत्यू

 महाप्रसादातून ७० जणांना विषबाधा; एका चिमुकलीचा मृत्यू

वाशिम, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिमच्या मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द इथे २८ सप्टेंबर रोजी गणपतीच्या प्रसादातून ६० ते ७० लोकांना विषबाधा झाली होती. यातील उपचार दरम्यान ९ वर्षीय पूनम रमेश पवार हिचा काल यवतमाळ येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला तर मृतकाची बहीण करिष्मा रमेश पवार , सौ आकांक्षा अजित पवार यांच्यावर दिग्रस येथील खाजगी रुग्णालय मध्ये उपचार सुरु आहे.

उमरी खुर्द येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने २७ सप्टेंबरला सायंकाळी प्रसाद वाटप करण्यात आला होता. त्यावेळी ६० ते ७० नागरिक आणि लहान मुलांना प्रसाद खाल्यानंतर मळमळ, उलटी तसेच हगवण लागल्याने २८ सप्टेंबर ला पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य पथक गावात दाखल झाले होते. त्यांनी गावातील काही लोकांवर उपचार केल्यानंतर या रुग्णा पैकी पाच रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने दिग्रस येथे पाठविण्यात आलं होतं. तर पूनम रमेश पवार हिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालय मध्ये भरती करण्यात आलं होतं.

सौ आकांक्षा अजित पवार वय २३ आणि करिष्मा रमेश पवार वय १५ वर्ष यांच्यावर वर दिग्रस येथील खाजगी रुग्णालय मध्ये उपचार करण्यात आले. तर गोकुळ राठोड यांचा मुलगा , रमेश पवार यांच्यावर पुसद येथे उपचार सुरु आहेत ह्या चार ही रुग्णाची प्रकृती धोक्या बाहेर आहे मात्र पूनम रमेश पवार हिच्यावर यवतमाळ येथील वैद्यकीय अधिकारी यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान २ आक्टोबर रात्री १ वाजतच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला.
शासकीय रुग्णालय मध्ये शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईक यांना देण्यात आला.

उमरी येथे तीन दिवसा पासून आरोग्य पथक दाखल

प्रसाद खाल्यामुळे मळमळ, उलटी , हगवण लागल्यामुळे पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाकडून ३० सप्टेंबर पासून गावातील ६० ते ७० रुग्णावर औषधोपचार करण्यात आले आहेत. इतर रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ अनिरुद्ध जाधव यांनी दिली आहे. गावात एक वैद्यकीय अधिकारी, २ आरोग्य साहायक, आरोग्य सेविका तसेच आरोग्य सेवक यांचे पथक गावात दाखल आहे.

एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा

स्वतः रमेश पवार, त्याच्या दोन मुली पूनम पवार, करिष्मा पवार आणि एक मुलगा अश्या एकाच कुटुंबातील चार जणांना प्रसाद खाल्याने विषबाधा झालीये. यातील शाळेत तिसरीत शिकणारी पूनम पवार ९ वर्ष हिचा मृत्यू झाला तर तिघांची प्रकृती धोक्या बाहेर असून करिष्मा पवारवर उपचार सुरु आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *