Asian Games – आज भारताच्या खात्यात ६ वे सुवर्णपदक जमा

 Asian Games – आज भारताच्या खात्यात ६ वे सुवर्णपदक जमा

हांगझोऊ, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज 5वा दिवस आहे. आज भारतीय पुरुष संघाने 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये दिवसातील पहिले सुवर्ण जिंकले. सरबजीत सिंग, अर्जुन सिंग आणि शिवा नरवाल या त्रिकुटाने या स्पर्धेत 1734 स्कोअर करत सुवर्णपदक जिंकले.

याआधी भारतीय वुशू खेळाडू रोशिबिना देवीने 60 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा 2022 मध्ये आतापर्यंत 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 11 कांस्य अशी एकूण 25 पदके जिंकली आहेत.

SL/KA/SL

28 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *