हॅरी पॉटर चित्रपटातील ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याचा मृत्यू

 हॅरी पॉटर चित्रपटातील ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याचा मृत्यू

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘हॅरी पॉटर’ या जग प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटात ‘अल्बस डंबलडोर’ची भूमिका साकारणारे अभिनेते सर मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते सर मायकल गॅम्बन यांच्या पत्नी आणि मुलाने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. सर मायकेल गॅम्बन यांच्या मृत्यूची माहिती त्यांची पत्नी लेडी गॅम्बन आणि मुलगा फर्गस यांनी माध्यमांना दिली आहे. ही दुःखद बातमी चाहत्यांना सांगताना ते म्हणाले की, ‘सर मायकल गॅम्बन यांच्या निधनाबद्दल सांगताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. ते एक प्रेमळ पती आणि वडील होते.’

अभिनेते सर मायकल गॅम्बन यांचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांचा हा लढा अयशस्वी ठरला आहे. अखेर या आजाराशी झुंज देत सर मायकल यांनी वयाच्या ८२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

केवळ चित्रपटच नव्हे तर, मायकल गॅम्बन यांनी रंगभूमीवरही काम केले होते. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या होत्या. जग प्रसिद्ध ‘हॅरी पॉटर’ या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या ‘अल्बस डंबलडोर’मुळे ते प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिले.

SL/KA/SL

28 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *